शेअर बाजारात मंदीचे संकेत देणारा हँगिंग मॅन Hanging Man आणि Shooting Star शूटिंग स्टार कँडलस्टिक पॅटर्न म्हणजे काय?
शेअर बाजारात तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) करताना वापरण्यात येणाऱ्या विविध कँडलस्टिक पॅटर्न (Candlestick Patterns) पैकीच अत्यंत महत्वाचे हँगिंग मॅन कँडलस्टिक पॅटर्न (Hanging Man Candlestick Pattern) आणि शूटिंग स्टार कँडलस्टिक पॅटर्न (Shooting Star Candlestick Pattern) आहेत. हे दोन्ही पॅटर्न अनुक्रमे हॅमर (Hammer Candlestick Pattern) आणि इनवर्टेड हॅमरचे (Inverted Hammer Candlestick Pattern) उलटे पॅटर्न आहेत. हँगिंग मॅन कँडलस्टिक पॅटर्न आणि शूटिंग स्टार कँडलस्टिक पॅटर्न हे बाजारात मंदीचे संकेत (Bearish Reversal) देत असतात.
हँगिंग मॅन आणि शूटिंग स्टार कँडलस्टिक पॅटर्न काय दर्शवितो?
हे दोन्ही पॅटर्न एकाच कँडलमूळे तयार होत असतात आणि त्याचे निर्माण होण्याचे ठिकाण कोणते आहे, त्यावर त्याची विश्वसनीयता अवलंबून आहे. हँगिंग मॅन आणि शूटिंग स्टार कँडलस्टिक पॅटर्न म्हणजे अनुक्रमे 1) फाशी घेतलेल्या माणसासारखे किंवा लटकविलेल्या माणसासारखे दिसणारे आणि 2) आकाशातून खाली पडणाऱ्या ताऱ्यासारखे दिसणारी कँडल. या दोन्ही कॅन्डल बाजारात मंदी (Bearish Reversal) येण्याची शक्यता दर्शवते कारण मार्केट अपट्रेंडमध्ये असताना (uptrend) त्याच्या शिखरावर (Top) तयार होतो. आणि येथून त्याला उलटी कलाटणी मिळते; म्हणजेच मार्केट किंवा एखाद्या शेअरची किंमत यू-टर्न घेवून झपाट्याने खाली येण्यास सुरुवात होते.
हँगिंग मॅन आणि शूटिंग स्टार कँडलस्टिक पॅटर्नची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत?
बॉडी लहान असते (Small Body):- या दोन्ही कँडलची बॉडी खूप लहान असते म्हणजे इतर कॅन्डलचे तुलनेत लहान आकार असतो आणि ही बॉडी हिरव्या (green) किंवा लाल (red) रंगाची असू शकते. असे असले तरी ट्रेड घेण्यासाठी लाल रंगाची बॉडी अधिक सकारात्मक मानली जाते, कारण याठिकाणी सेलर्स (विक्रेते) लोकांची संख्या वाढलेली असते. आता ही लहान बॉडी तयार होण्याचे कारण काय? तर त्या कॅन्डलची ओपनिंग (opening) आणि क्लोजिंग (closing) किमतींमध्ये फारसा फरक नसतो, म्हणून त्याचा आकार हँगिंग मॅन आणि शूटिंग स्टार सारखा दिसतो.
खालच्या आणि वरच्या बाजूला शेपटी किंवा सावली लांब असणे:- (Long Lower and upper Wick/Shadow): हँगिंग मॅन आणि शूटिंग स्टार ओळखण्याची दुसरी कसोटी म्हणजे अनुक्रमे त्याची खालची आणि वरची सावली किंवा शेपटी खूप लांब असते. म्हणजे हातोड्याच्या दांडयासारखे दिसते. ही शेपटी बॉडीच्या लांबीच्या किमान दुप्पट किंवा त्याहून अधिक लांब असते. ही शेपटी असे दर्शविते की, खरेदीदार लोकांनी (Buyers) किंमत खूप वर नेली होती; परंतु नंतर विक्रेत्यानी (sellers) जोरदार विक्री करून किंमत खाली आणली. म्हणजे याठिकाणी विक्रेते लोकांची संख्या वाढली.
हँगिंग मॅन आणि शूटिंग स्टारचे महत्त्व आणि हा पॅटर्न ओळखून त्याचा वापर कसा करावा?
अगोदरच संगीतल्यानसुयर हँगिंग मॅन आणि शूटिंग स्टार शेअर बाजारातील 'बियरीश रिव्हर्सल' (Bullish Reversal) म्हणजेच मार्केट खाली येण्याचे मजबूत संकेत देत असतो. हे दोन्ही पॅटर्न दर्शवितात की, 1) खरेदीदारांचा दबाव कमी होतोय, 2) विक्रेत्यांची ताकद वाढत आहे, आणि 3) ट्रेंड बदलण्याची शक्यता आहे म्हणजे मार्केट खालच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.
पॅटर्न कुठे शोधायचा ?
हा पॅटर्न नेहमी अपट्रेंडमध्ये शोधा. जर तो डाऊनट्रेंडमध्ये (down trend) दिसत असेल, हॅमर किंवा इनवर्टेड हॅमर म्हणतात आणि तो तेजीचा (bullish) संकेत देऊ शकतो. रेसिस्टन्स लेवल (Resistance Level) वर हा पॅटर्न तयार झाल्यास मार्केट खाली जाण्याचे मोठे संकेत मिळत असतात. त्यामुळे हा पॅटर्न कोणत्या ठिकाणी तयार झाला याला अधिक महत्व आहे. कारण हँगिंग मॅन आणि शूटिंग स्टार चार्टवर अनेक ठिकाणी तयार होते. मात्र प्रत्येक वेळी आपण ट्रेड न घेता रेसिस्टन्स लेवलवर हा पॅटर्न तयार होण्याची वाट पाहणेच फायद्याचे असते. हा पॅटर्न Resistance Level वर तयार झाल्यावर त्यानंतरची कॅन्डल बियरीश (Bearish Candle) म्हणजेच लाल रंगाची तयार होणे गरजेचे असते. हँगिंग मॅन आणि शूटिंग स्टारचे वर स्टॉप लॉस लावून ट्रेडमध्ये प्रवेश घेता येतो.
टिप्पणी पोस्ट करा