दुहेरी किंवा तिहेरी शिखर DOUBLE & TRIPPLE TOP म्हणजे काय?
या चार्ट पॅटर्नला दुहेरी किंवा तिहेरी शिखर संबोधले जाते. म्हणजेच एखादा शेअर किंवा बाजार सलग दोन किंवा तीन वेळेस एकाच रेसिसटंट लेवलवर (Resistance Level) येवून शिखर गाठतो; मात्र त्याचे वर जात नाही. म्हणजेच मार्केट किंवा बाजारातील एखाद्या स्टॉकची किंमत विशिष्ट वेळी (म्हणजेच आपण पाहत असलेला 5, 15, 30 मिनिटांचा चार्ट किंवा 1, 2 तास किंवा इतर कोणत्याही टाइम फ्रेमचा चार्ट) एकाच ठिकाणी येवून खाली जाण्याचा प्रयत्न करते. दोन वेळेस ती किंमत एकाच निश्चित ठिकाणी येवून खाली जाते त्यावेळी डबल टॉप तयार होतो. म्हणजेच अशा वेळी विक्री करणारे किंवा सेलर लोकांची संख्या खरेदी करणाऱ्या लोकांच्या तुलनेत वाढून मार्केट झपाट्याने खाली कोसळण्यास सुरुवात होते. Double Top पॅटर्न इंग्रजीमधील M या अक्षरासारखा दिसत असतो. तर Triple Top साठी इंग्रजीमध्ये M आणि A जोडून समजून घेता येईल.
![]() |
Example of triple top |
दुहेरी किंवा तिहेरी शिखर DOUBLE & TRIPPLE TOP तयार होण्याचे लॉजिक किंवा ट्रेडर्स सायकॉलॉजी काय असते?
मार्केटमध्ये दुहेरी किंवा तिहेरी शिखर तयार होण्याची कारणे काय आहेत? किंवा हे पॅटर्न तयार होतातच का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आणि ते समजल्याशिवाय चांगला ट्रेडर सुद्धा होणे शक्य नाही. एखादा शेअर किंवा बाजार सलग दोन किंवा तीन वेळेस एकाच रेसिसटंट लेवलवर (Resistance Level) आल्यास आणि त्याचे वर जात नाही, अशा वेळी बाजारात विक्रेत्याची अशी मानसिकता होते की बाजार सलग दुसऱ्या वेळी रेसिसटन्स लेवलवर आल्याने पुन्हा खाली जाण्याची शक्यता आहे. यामुळे त्याठिकाणी विक्रेते मोठ्या प्रमाणावर विक्री करतात आणि मार्केट खाली येण्यास सुरुवात होते. त्यानंतर मार्केट किंवा बाजारातील एखाद्या स्टॉकची किंमत खाली न जाता पुन्हा वर जात असेल आणि पुन्हा रेसिसटन्स लेवलवरून खाली येत असेल तर त्याठिकाणी तिहेरी शिखर Triple Top तयार होतो आणि यावेळी मात्र मार्केट झपाट्याने खाली येते. मार्केट खाली आणि वर का जाते? या प्रश्नाचे उत्तर एकच आहे, की मार्केटमध्ये ट्रेडिंग सायकॉलजी (Trading Psychology) महत्वाची भूमिका बजावत असते.
![]() |
वरील चार्ट मध्ये BTC-USD Chart चे 21 June 2025 चे उदाहरण दिले आहे. हे उदाहरण समजून घेवून त्याचा अभ्यास करावा. |
वरील चार्ट नुसार महत्वाची आणि ध्यानात ठेवणे गरजेची बाब उदाहरणासह..
वर दिलेला चार्ट BTC-USD चा दिनांक 21 जून 2025 रोजीचा आहे. हा चार्ट काळजीपूर्वक पाहिला तर 1,09,000 ची लेवळ रेसिसटंट झोन म्हणून काम करीत आहे. या ठिकाणी मार्केट आल्यावर दोन नव्हे तर तीन वेळा वर जाण्याचा प्रयत्न मार्केटने केला आहे. मात्र त्या रेसिसटंट झोनवर विक्री करणाऱ्यांची म्हणजेच सेलर लोकांची संख्या, खरेदी करणाऱ्यांच्या तुलनेत वाढलेली असल्याने मार्केट झपाट्याने खाली आले. याशिवाय सोबत अनेक चार्ट दिलेले आहेत, जे की double आणि triple चार्टचे आहेत. त्यांचा सुद्धा अभ्यास करा, कारण चार्ट तयार झाल्यावर आखीवरेखीवच होतील याची खात्री नसते. चार्ट ओळखणे महत्वाचे असते.
दुहेरी आणि तिहेरी शिखरचा वापर करून ट्रेड कसा घ्यायचा आणि टार्गेट किती ठेवायचे?
दुहेरी आणि तिहेरी शिखरचा वापर करून ट्रेड कसा घ्यायचा आणि टार्गेट किती ठेवायचे या बाबीचा विचार केल्यास, सर्वप्रथम पहिला टॉप तयार झाल्यावर रेसिस्टनस लेवलवरून (Resistance Level) मार्केट जात असते. मात्र मार्केट खाली जात असताना टॉपवर एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न (Candlestick Pattern) तयार झाला का? हे पाहणे संयुक्तिक ठरेल. सेल सिग्नल (Sell Signal) दर्शविणारी एखादी कॅन्डल किंवा पॅटर्न तयार झाल्यावर ट्रेड घेणे आवश्यक आहे. आणि एकदा ट्रेडमध्ये प्रवेश केला असल्यास किंवा किंमत वरच येत असल्यास घाबरून न जाता तिहेरी टॉपची निर्मिती होण्याची शक्यता पाहून पहिला आणि दूसरा टॉपचे वर स्टॉप लॉस Stop Loss लावून ट्रेडमध्ये थांबणे कधीही चांगले असते. कारण बऱ्याच वेळेस मार्केट तिहेरी शिखर गाठण्यासाठी थोडेसे वर येवून झपाट्याने खाली जात असते. ही बाब वरील चार्ट वरुण लक्षात येईल. तसेच या ट्रेडमध्ये मार्केट जेथून वर गेले होते, त्या पातळीपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याने तेथ पर्यंत टार्गेट ठेवणे आवश्यक आहे किंवा आपल्या सोयीनुसार किमान 1:2 किंवा 1:3 असे टार्गेट असावे.
टिप्पणी पोस्ट करा