दुहेरी किंवा तिहेरी तळ म्हणजे काय ?
दुहेरी आणि तिहेरी बॉटम म्हणजे काय? या प्रश्नाचे साधे उत्तर आहे की, एखाद्या विशिष्ट वेळी आणि एखाद्या विशिष्ट बाजाराने किंवा शेअरने दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा मार्केटचा तळ गाठला आहे, अशी स्थिति आणि त्यालाच दुहेरी किंवा तिहेरी तळ संबोधले जाते. म्हणजेच एखादा शेअर किंवा बाजार सलग दोन किंवा तीन वेळेस एकाच सपोर्ट लेवलवर येवून तळ गाठतो; मात्र त्याखाली जात नाही. म्हणजेच मार्केट किंवा बाजारातील एखाद्या स्टॉकची किंमत विशिष्ट वेळी (म्हणजेच आपण पाहत असलेला 5, 15, 30 मिनिटांचा चार्ट किंवा 1, 2 तास किंवा इतर कोणत्याही टाइम फ्रेमचा चार्ट) एकाच ठिकाणी येवून वर जात असते. हा एक महत्वाचा आणि खूपच फायदेशीर असा चार्ट पॅटर्न आहे.
![]() |
डबल बॉटम |
DOUBLE AND TRIPLE BOTTOM
It is opposite of the DOUBLE or TRIPLE TOP. When price of a share or asset reaches a low price twice in a row with same support in between, a double bottom is formed. This price action pattern looks like "W" or ‘WV’ Shape and is a bullish technical reversal pattern.
या चार्ट पॅटर्नचे लॉजिक काय आहे? किंवा ट्रेड घेण्याचे कारण काय आहे?
मित्रांनो, या चार्ट पॅटर्नद्वारे ट्रेड घेण्याचे सबळ कारण किंवा लॉजिक असे आहे, की उदाहरणार्थ येथे आपण आयसीआयसीआय बँकेच्या शेअरची किंमत (ICICI Bank Share Price) प्रथम 1470 पर्यंत खाली आली. त्यानंतर किंमत थोडीशी वर गेली आणि 1480 वर स्थिरावली. त्याठिकाणी काही काही वेळ घालवून वर न जाता पुन्हा म्हणजे दुसऱ्यांदा खाली आली आणि 1470 वर थांबली. येथून किंमत वर जाण्याची शक्यता जास्त आहे, कारण दुसऱ्यांदा किंमत तेथे आली. त्याठिकाणी प्रथम वेळचे खरेदीदार आणि आता दुसऱ्या वेळचे खरेदीदार वाढले आणि किंमत वर जायची खूप दाट शक्यता असते. हा झाला Double Bottom अर्थात दुहेरी बॉटम. आणि किंमत आणखी वर गेली आणि 1480-1485 वरुण पुन्हा 1470-1468 वर येवून थांबून वर जात असेल तर Triple Bottom तयार होतो. आणि तेथून मात्र किंमत झपाट्याने वर जाते. कारण त्याठिकाणी सलग तीन वेळा Liquidity घेतली आहे किंवा Stop Loss Hunt झाले आहेत. Liquidity आणि Stop Loss Hunt बाबत याच ब्लॉगवर आपणास माहिती मिळेल.
दोन वेळेस ती किंमत एकाच निश्चित ठिकाणी येवून वर जाते त्यावेळी डबल बॉटम तयार होतो. म्हणजेच अशा वेळी खरेदी करणारे किंवा बायर लोकांची संख्या विक्री करणाऱ्या लोकांच्या तुलनेत वाढत असते. मात्र काही वेळेला डबल बॉटमच्या जागून किंमत वर जाण्याऐवजी; विक्रेते किंवा सेलर लोकांची संख्या थोडी वाढून किंमत आणखी पूर्वीच्या डबल बॉटमच्या जागेवर येते. मात्र त्याठिकाणी अगोदरच खरेदी करणारे किंवा बायर लोकांची मोठी संख्या असते आणि त्याच लेवलवरून मार्केट वर जाणार असा अंदाज अनेकांनी बांधलेला असल्याने खरेदी करणारे लोकांची संख्या आणखी वाढली जाते आणि तिहेरी बॉटम किंवा तळ तयार होवून किंमत झपाट्याने वर जाते.
दुहेरी आणि तिहेरी तळाचा वापर करून ट्रेड कसा घ्यायचा आणि टार्गेट किती ठेवायचे?
दुहेरी आणि तिहेरी बॉटमचा वापर करून ट्रेड कसा घ्यायचा आणि टार्गेट किती ठेवायचे या बाबीचा विचार केल्यास, सर्वप्रथम पहिला बॉटम तयार झाल्यावर सपोर्ट लेवलवरून (Support Level) मार्केट जात असते. मात्र मार्केट वर जात असताना बॉटमवर एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न (Candlestick Pattern) तयार झाला का? हे पाहणे संयुक्तिक ठरेल. बाय सिग्नल (Buy Signal) दर्शविणारी एखादी कॅन्डल किंवा पॅटर्न तयार झाल्यावर ट्रेड घेणे आवश्यक आहे. आणि एकदा ट्रेडमध्ये प्रवेश केला असल्यास किंवा किंमत खालीच येत असल्यास घाबरून न जाता तिहेरी बॉटमची निर्मिती होण्याची शक्यता पाहून पहिला आणि दूसरा बॉटमचे खाली स्टॉप लॉस Stop Loss लावून ट्रेडमध्ये थांबणे कधीही चांगले असते. कारण बऱ्याच वेळेस मार्केट तिहेरी तळ गाठण्यासाठी थोडेसे खाली येवून झपाट्याने वर जात असते. ही बाब वरील चार्ट वरुण लक्षात येईल. तसेच या ट्रेडमध्ये मार्केट जेथून खाली आहे, त्या पातळीपर्यंत वर जाण्याची शक्यता असल्याने तेथ पर्यंत टार्गेट ठेवणे आवश्यक आहे किंवा आपल्या सोयीनुसार किमान 1:2 किंवा 1:3 असे टार्गेट असावे.
टिप्पणी पोस्ट करा