Marubozu Candlestick Pattern: समजून घ्या: खरेदीदार आणि विक्रेते प्रभावशाली असल्याचे दर्शविणारा शेंडी नसलेला मारुबोझू कँडलस्टिक पॅटर्न

मारुबोझू म्हणजे काय हे जाणून घेऊ या सोप्या भाषेत


सोपे सांगायचे झाल्यास "मारुबोझू" हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ 'टक्कल' किंवा 'शेंडी नसलेला' असा होतो. म्हणजेच मारुबोझू कँडलस्टिक पॅटर्नमधील कॅंडलच्या वर किंवा खालच्या बाजूला कोणतीही शॅडो (shadow) किंवा विक (wick) नसते, तर फक्त बॉडी मोठी असते. याचाच अर्थ, एखाद्या शेअरच्या किमतीचे उदाहरण घ्यायचे झाल्यास त्याची उडण्याची किंमत Opening Price आणि बंद होण्याची किंमत Closing Price यामध्ये खूप मोठी तफावत असते आणि त्यामध्ये त्या किमतीने High किंवा Low लावलेला नसतो. म्हणजेच हाय आणि लो लावल्याच्या Wick किंवा Shadow तयार होत नाहीत. अशी कॅन्डल Bullish किंवा Bearish अशा दोन्ही प्रकारची असू शकते. त्यानुसार त्याचे दोन प्रकार पडलेले असतात. या कॅण्डल आकाराने इतर कॅण्डल पेक्षा मोठे असतात म्हणजे त्यांची उंची जास्त असते.

मारुबोझू कँडलस्टिक पॅटर्नचे दोन प्रकार आहेत


बुलिश मारुबोझू कँडलस्टिक (Bullish Marubozu):-


ही एक लांब हिरव्या रंगाची कॅंडल असते आणि असे दर्शविते की एखाद्या शेअरची किंमत त्या ठराविक कालावधीत बाजार उघडल्यानंतर सतत वाढत राहिली. आणि या किमतीच्या वाढीदरम्यान तिने High तिचे Opening Price एवढाच लावला आणि Low सुद्धा Closing Price एवढाच लावला (किंवा थोडा फार नगण्य निम्नस्तर आणि उच्चस्तर लावला). म्हणजेच या Marubozu Candle ने खाली आणि वरच्या बाजूला कोणतीही Wick किंवा Shadow किंवा शेपटी तयार केली नाही. याचा अर्थ, बाजारात त्या ठराविक वेळेत खरेदीदारांचे (buyers) पूर्ण नियंत्रण होते आणि त्यांनी सतत शेअर खरेदी केले आणि त्यामुळे त्याची किंमत सतत वाढत गेली. ही Candle Stick विशेषत: मार्केट खालच्या दिशेने येत असताना सपोर्ट लेवलवर आल्यानंतर तयार झाल्यास तेथे Trend Reversal होण्याची शक्यता असते म्हणजेच Uptrend सुरू होण्याचे संकेत असतात. आणि दरम्यानच्या काळात तयार झाल्यास पूर्वीचा ट्रेंड पुढे सुरू (Trend Continuation) राहणार असल्याचे दर्शविते.

बियरिश मारुबोझू (Bearish Marubozu):


बियरिश मारुबोझू ही एक लांब लाल रंगाची कॅंडल असते आणि असे दर्शविते की एखाद्या शेअरची किंमत त्या ठराविक कालावधीत बाजार उघडल्यानंतर सतत खाली येत राहिली. आणि या किमतीच्या वाढीदरम्यान तिने High तिचे Opening Price एवढाच लावला आणि Low सुद्धा Closing Price एवढाच लावला (किंवा थोडा फार नगण्य निम्नस्तर आणि उच्चस्तर लावला). म्हणजेच या Marubozu Candle ने खाली आणि वरच्या बाजूला कोणतीही Wick किंवा Shadow किंवा शेपटी तयार केली नाही. याचा अर्थ, बाजारात त्या ठराविक वेळेत विक्रेत्यांचे (Sellers) पूर्ण नियंत्रण होते आणि त्यांनी सतत शेअर विक्री केले आणि त्यामुळे त्याची किंमत सतत खाली येत गेली. ही Candle Stick विशेषत: मार्केट वरच्या दिशेने येत असताना रेसिस्टन्स लेवलवर आल्यानंतर तयार झाल्यास तेथे Trend Reversal होण्याची शक्यता असते म्हणजेच Downtrend सुरू होण्याचे संकेत असतात. आणि दरम्यानच्या काळात तयार झाल्यास पूर्वीचा ट्रेंड पुढे सुरू (Trend Continuation) राहणार असल्याचे दर्शविते.

मारुबोझू कँडलस्टिक पॅटर्न Marubozu Candlestick Pattern चे प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत?



1) मोठी बॉडी (Real Body) असते: मारुबोझू कँडलस्टिक पॅटर्नमध्ये एक मोठी बॉडी असते. ही बॉडी चार्टवर दिसणाऱ्या इतर कँडलच्या तुलनेत मोठी असते, लांब असते. सोबत दिलेल्या अनेक छायाचित्रात दाखवली तशी दिसून येते.

2) स्पष्ट दिशा दर्शविते: मारुबोझू कँडलस्टिक पॅटर्नमध्ये त्या कँडलला शॅडो नसल्यामुळे, बाजाराची दिशा स्पष्टपणे दाखवून देत असते. आणि ती दिशा खालच्या बाजूने असो की वरच्या दिशेने असो.

3) मारुबोझू कँडलस्टिक तीव्र गती दर्शवते: हा पॅटर्न बाजारातील तीव्र खरेदी किंवा विक्रीचा दबाव दर्शवते, म्हणजे बाजाराची दिशा एका विशिष्ट दिशेने जाणार असल्याची तीव्र भावना सूचित करते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने