फॉरेक्स, क्रीप्टो, शेअर मार्केटमध्ये बरबाद झालेल्यांसाठी.... (For those who have spoiled their financial life due to online share market, forex and crypto trading)

फॉरेक्स, क्रीप्टो,   शेअर मार्केटमध्ये बरबाद झालेल्यांसाठी लेखकाचे मनोगत.... (For those who have spoiled their financial life due to online share market, forex and crypto trading)



    2010 ते 2025 या गेल्या 15 वर्षांचे कालावधीत सुमारे 6 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये स्वाहा.... 15 वर्षांचा कालावधी आणि 6 लाख रुपये याचा विचार केल्यास ही रक्कम निश्चितच काही मोठी नाही. कारण ही रक्कम मी एकाच वेळी किंवा पाच सहा महिन्यात घातली नाही, तर टप्प्याटप्प्याने घातली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास, या व्यवसायात मी सातत्य ठेवले नाही. सातत्य ठेवले असते तर, कदाचित जास्त रक्कम गेली असती; मात्र व्यावसायिक कौशल्य लवकर हाती लागले असते, व्यावसायिक मानसिकता विकसित होवून आजचे चित्र वेगळे असते. एका-दोन महिन्यात 10-10 लाख रुपये घालून करोडपती होण्याचे स्वप्न पहाणारे बहाद्दर आपण पाहिले असतील. परंतु एखाद्या अतिसामान्य आणि हातावरचे पोट असणाऱ्या व्यक्तीसाठी 5-6 लाख रुपयांचे नुकसान होणे खूप मोठी बाब आहे.

    त्यातही झालेले नुकसान सांगायची सुद्धा लाज, आपराधिपणा ! श्रमाचा, घामाचा पैसा असा हातातून निघून गेला, आणि त्यावर कर्जबाजारी झाल्यावर तर आत्महत्या करण्याची वेळ अनेकांवर आलेली आहे. या व्यवसायात बरबाद होवून ज्यांनी नंतर हा व्यवसाय सोडला, ते तर या व्यवसायाला गॅंबलिंग, जुगार संबोधून मोकळे होतात. इतरांना सुद्धा या व्यवसायाच्या नादी न लागण्याचा सल्ला देतात. तसेच पुन्हा हा व्यवसाय करायचा म्हटल तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

    असे असले तरी, गॅंबलिंग आणि ट्रेडिंग यामध्ये जमीन आसमानचे अंतर्गत आहे. होय, यासाठी मी जमीन-आसमान हेच शब्द वापरणार. जुगारात लकी ड्रॉ आहे तर शेअर मार्केट किंवा ट्रेडिंग हे अभ्यासाने कौशल्याचे व्यवसाय आहे एखादा निश्चित पत्ता किंवा मटका/ जुगाराचा आकडा, लॉटरीचे तिकीट आपलेच निघेल किंवा आपलाच आकडा, पत्ता (कार्ड) लागेल हे आपल्या हातात नसते किंवा त्याचा अंदाज सुद्धा बांधता येत नाही. कारण यामध्ये कोणतेही बौद्धिक, मानसिक कौशल्य पणाला लागत नाही. सर्व काही देवाच्या भरोश्यावर. ट्रेडिंगमध्ये याचे उलट आहे. कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न यांचा अभ्यास करून व्यावसायिक मानसिकता (ट्रेडिंग सायकॉलॉजी) विकसित केल्यास मर्यादित नुकसान आणि अमर्यादित नफा मिळवून देणारा ट्रेडिंगसारखा दुसरा कोणताही व्यवसाय नाही. नफा तोटा जे काही होत आहे, ते सर्व चार्टवर डोळ्यांनी दिसते सुद्धा. या पुस्तकांमध्ये माझ्या गेल्या 10-15 वर्षाच्या अनुभवातून मी जे काही शिकलो जे मला अवगत झाले आहे याचा थोडक्यात आढावा घेणार आहे आणि यामध्ये यशस्वी होता येईल आणि यशस्वी होण्याचा मूलभूत मंत्र काय हे सुद्धा आपणास सांगणार आहे निश्चितच आशा आहे की माझा ब्लॉग वाचल्यानंतर आपण यशस्वी व्हाल.

    मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, एक ना धड भराभर चिंध्या जमा करण्यापेक्षा या ब्लॉगमध्ये  दिलेले चार्ट पॅटर्न आणि कॅन्डल स्टिक पॅटर्न पैकी कोणत्याही केवळ आणि केवळ चार ते पाचमध्ये आणि मी तर असे म्हणेन की, दोन किंवा तीनवरच प्रभुत्व मिळवा, त्यावर मास्टरी करा आणि फक्त नियम पाळा. हे नियम सुद्धा मी देणार आहे, जे की एक व्यावसायिक म्हणून पाळणे आवश्यकच नव्हे तर बंधनकारक आहेत. त्यानंतर पहा येणाऱ्या 2 वर्षात किंवा त्यापेक्षाही अगोदर आपले करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुनः नव्या जोमाने आणि केवळ आणि पैसा कामावण्यासाठी सुरुवात करू या आणि केवळ ट्रेडिंग शिकण्यासाठी नाही....  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने