कोणत्याही प्रकारच्या शेअर बाजारात म्हणजे तुम्ही भारतीय बाजारात (Indian Share Market, Commodity Market) काम करा किंवा फॉरेक्समध्ये (Forex Market, Crypto Market), सर्वत्र प्राइस अॅक्शन सारखेच काम करीत असते. एक यशस्वी ट्रेडिंग करण्यासाठी 'ट्रेंडलाइन' आणि 'प्राइस ॲक्शन' (Price action of trendline) या दोन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. या दोन्हींचा एकत्रित वापर करून ट्रेडर्सला बाजाराची दिशा ओळखता येते आणि त्यानुसार ट्रेडर बाजारात संभाव्य खरेदी-विक्रीच्या संधी शोधू शकतो. त्यासाठी अभ्यास आणि अभ्यासच करावा लागतो, हे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. सोबत दिलेले चार्ट काळजीपूर्वक पहा आणि ट्रेडिंग करताना असेच निरीक्षण करण्याची सवय डोळ्यांना लावा, म्हणजे तांत्रिक विश्लेषण अचूक होईल. ट्रेंड लाईनसाठी पारंपरिक चार्ट ऐवजी लाईन चार्ट वापरल्यास ट्रेंड लाईन (Line Chart) सहज रेखाटता येते.
शेअर मार्केटमधील ट्रेंडलाइन (trendline) म्हणजे काय?
ट्रेंड म्हणजे कल आणि लाईन म्हणजेच रेष ! म्हणजेच बाजाराचा कल किंवा दिशा दर्शविणारी रेषा. केवळ लाईन मारून सुद्धा बाजारात बक्कळ पैसा कमावता येवू शकतो, याचे उत्तम उदराहरण म्हणजे ट्रेंडलाइन हे होय. रेषा मारणे एक साधे पण अत्यंत प्रभावी तांत्रिक विश्लेषणाचे साधन असून चार्टवर रेषा मारणे सुद्धा एक कला आहे; अभ्यास आहे. कारण एका विशिष्ट दिशेने जाणाऱ्या किमतीच्या प्रमुख बिंदूंना जोडूनच ट्रेंडलाइन आखावी लागते आणि त्यानुसार आपल्याला बाजाराचा कल (Trend) कोणत्या दिशेने आहे, खालच्या बाजूने आहे की, वरच्या दिशेने आहे हे समजते.
अपट्रेंड (Uptrend) मध्ये ट्रेंड लाईन कसे काम करते Trendline in Uptrend?
ज्यावेळी बाजारात तेजी असते म्हणजेच बाजारात Higher High आणि Higher Low तयार होतात त्यावेळी बाजार वरच्या दिशेने आहे असे समजले जाते. शेअरची किंमत सतत नवीन उच्चांक (Higher Highs) आणि उच्च नीचांक (Higher Lows) बनवत वर जाते त्यावेळी खालच्या बिंदूंना (Higher Lows) जोडून वरच्या दिशेने दिशेने जाणाऱ्या आखलेल्या रेषेला 'अपट्रेंड लाइन' म्हणतात. ही खालची रेषा मागणी क्षेत्र (Demand Zone) किंवा सपोर्ट झोन (Support Zone) म्हणून काम करते. म्हणजे या रेषेवर बाजार आल्यास खरेदीदार लोकांना मोठा आधार (support) मिळतो किंवा याठिकाणी मागणी (demand) वाढलेली असते.
डाउनट्रेंड (Downtrend) मध्ये ट्रेंड लाईन कसे काम करते Trendline in Downtrend?
ज्यावेळी बाजारात मंदी असते म्हणजेच बाजारात Lower Low आणि Lower High तयार होतात त्यावेळी बाजार खालच्याच्या दिशेने आहे असे समजले जाते. शेअरची किंमत सतत नवीन नीचांक (Lower Lows) आणि नीच उच्चांक (Lower High) बनवत वर जाते त्यावेळी वरच्या बिंदूंना (Lower Lows) जोडून खालच्या दिशेने दिशेने जाणाऱ्या आखलेल्या रेषेला 'डाऊन ट्रेंड लाइन' म्हणतात. ही वरची रेषा पुरवठा क्षेत्र (Supply Zone) किंवा रेसिस्टन्स झोन (Resistance Zone) म्हणून काम करते. म्हणजे या रेषेवर बाजार आल्यास विक्री करणारे लोक किमत वर न जाण्याचा अडसर (Resistance) मिळतो किंवा याठिकाणी विक्री करणाऱ्यांची संख्या वाढल्याने मालाचा पुरवठा (supply) वाढलेला असतो.
ट्रेंडलाइनवर प्राइस ॲक्शन कसे काम करते Price action of trendline?
जेव्हा शेअरची किंमत आपल्या ट्रेंडलाइनजवळ येते, तेव्हा प्राइस ॲक्शनचे अचूक विश्लेषण करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ज्यावेळी सपोर्ट म्हणून अपट्रेंड लाइन निर्माण होते त्यावेळी दोन बिंदु जोडले गेल्यावर तिसऱ्या वेळी जेव्हा किंमत त्या ट्रेंड लाईनवर येते त्यावेळी ट्रेड घेता येवू शकतो. तिसऱ्या वेळी चांगला ट्रेड मिळतो; मात्र त्यानंतर ट्रेंड लाईन ज्यावेळी सपोर्ट लेवळवर येते त्यावेळी मोठे टार्गेट मिळण्याची शक्यता कामी होते आणि पुढे त्यानंतर कमी कमी टार्गेट मिळत असतात.
अ) अपट्रेंडमध्ये
जेव्हा शेअरची किंमत खाली येऊन ट्रेंडलाइनला स्पर्श करते, तेव्हा ती एक महत्त्वाची सपोर्ट पातळी मानली त्यामुळे या ठिकाणी किंमतीत उसळी (Bounce) घेवून पुन्हा वरच्या दिशेने जायला लागते. जर ट्रेंडलाइनजवळ 'हॅमर' (Hammer), 'बुलिश एन्गलफिंग' (Bullish Engulfing) किंवा 'मॉर्निंग स्टार' (Morning Star) यांसारखे तेजी दर्शविणारे म्हणजेच buy signal देणारे कोणतेही कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत असतील, तर तो खरेदीसाठी एक मजबूत संकेत मानला जातो. किमतीत ब्रेकडाउन (Breakdown) झाला म्हणजेच जर किंमत ट्रेंडलाइन तोडून खाली गेली आणि तिथे बराच वेळ थांबली तर तो ट्रेंड बदलण्याचा किंवा कमकुवत होण्याचा संकेत असतो. याला 'ट्रेंडलाइन ब्रेकडाउन' म्हणतात. यानंतर बाजारात मंदी येवून बाजार खाली येण्याची दाट शक्यता असते.
ब) डाउनट्रेंडमध्ये
जेव्हा शेअरची किंमत वर जाऊन ट्रेंडलाइनला स्पर्श करते, त्याठिकाणी किंमत वर जाण्यासाठी बाजाराला मोठा प्रतिकार म्हणजेच रेझिस्टन्स करावा लागतो. त्यामुळे ट्रेंडलाइनवरून रेझिस्टन्स (Resistance & Rejection) घेवून किंमत खालच्या दिशेने प्रवास सुरू करते. जर ट्रेंडलाइनजवळ 'शूटिंग स्टार' (Shooting Star), 'बेअरिश एन्गलफिंग' (Bearish Engulfing) किंवा 'इव्हनिंग स्टार' (Evening Star) यांसारखे मंदीचे दर्शविणारे कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसले, तर तो विक्रीसाठी (Short Sell) एक चांगला संकेत मानला जातो. मात्र जर याठिकाणी ब्रेकआउट (Breakout) झाला जर किंमत ट्रेंडलाइन तोडून वर गेली आणि तेथेच बराच वेळ टिकून राहिली, तर तो डाउनट्रेंड संपून अपट्रेंड सुरू होण्याचा संकेत असू शकतो. याला 'ट्रेंडलाइन ब्रेकआउट' म्हणतात.
टिप्पणी पोस्ट करा