शेअर बाजारात लाखो, करोडो रुपये घालून बरबाद झाल्यावर शेवटी कोण वाचू शकेल याचा शोध घेतल्यास 99 टक्के लोक “प्राइस ॲक्शन" (Price Action) कडे वळतात. म्हणजे शेअर बाजारातील कोणत्याही प्रकारच्या (उदा. स्टॉक, कमोडिटी, चलन) शेअरची किंमत कशी हालचाल करते याचा अभ्यास करणे म्हणजेच प्राइस ॲक्शन समजून घेणे होय.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्या शेअरच्या किंमतीत ठराविक वेळेत झालेली क्रिया. आता ही क्रिया, कृती किंवा action, मुव्हमेंट, हालचाल कोणत्या पद्धतीने झाली आहे, म्हणजेच किंमत खाली कोसळली तर किती आणि कशा पद्धतीने आणि वर गेली तर किती आणि कोणत्या पद्धतीने आणि खाली आणि वर सुद्धा गेली नाही तर एकाच ठिकाणी थोड्याफार फरकाने कशी हालचाल झाली, याचा अभ्यास म्हणजेच प्राइस ॲक्शनचा अभ्यास करणे होय.
एखादा ट्रेडर वेगवेगळे तांत्रिक इंडिकेटर्स, ट्रेंड लाईन, चार्ट पॅटर्न, कॅन्डल स्टिक पॅटर्न, सपोर्ट अँड रेसिस्टन्स आदींचा वापर करतो आणि ट्रेड घेतो. Price Action च्या बाबतीत मात्र Technical Indicators चा वापर केला जात नाही. उघड्या डोळ्यांनी Chart पाहून ट्रेडमध्ये प्रवेश केला जातो आणि बाहेर सुद्धा पडले जाते. बरेचसे ट्रेडर्स Price Action द्वारे ट्रेड घेताना फक्त आणि फक्त Clean Chart वापरतात म्हणजेच Chart Without Any Indicator !
प्राइस ॲक्शनमध्ये समावेश होणारे चार्ट पॅटर्न
आता Price Action चा अभ्यास करताना अगोदर आपल्याला वेगवेगळे चार्ट पॅटर्न आणि कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न शिकावे लागतात. हे पॅटर्न चार्टचे असोत की, कॅन्डलस्टिकचे ! ते शिकल्याशिवाय आपण चार्ट वाचू शकणार (Chart Reading) नाहीत.
Chart Pattern: प्राइस ॲक्शनमधील चार्ट पॅटर्न
Chart Patterns म्हणजेच किमतीच्या हालचालीमुळे तयार होणारे विशिष्ट प्रकारचे चार्टवरील आकार. जसे की हेड अँड शोल्डर्स (Head and Shoulders), इनवर्टेड हेड अँड शोल्डर्स (Inverted Head and Shoulders), डबल टॉप/ डबल बॉटम (Double Top/Double Bottom), ट्राय-एंगल (Triangle), कप अँड हॅंडल (Cup and Handle), इनवर्टेड कप अँड हॅंडल (Inverted Cup and Handle), रायझिंग वेज (Rising Wedge), फॉलिंग वेज (Falling Wedge), बुल्लिश रेक्टअॅंगल (Bullish Rectangle), बियरिस रेक्टअॅंगल (Bearish Rectangle), बुल्लिश फ्लॅग (Bullish Flag), बियरिस फ्लॅग (Bearish Flag), बुल्लिश सीमेट्रिकल ट्रायअॅंगल (Bullish Symmetrical Triangle), बेअरिस सीमेट्रिकल ट्रायअॅंगल (Bearish Symmetrical Triangle), असेंडिंग ट्रायअॅंगल (Ascending Triangle), डिसेंडिंग ट्रायअॅंगल (Descending Triangle) इत्यादी चार्ट पॅटर्न आहेत.
Candlestick Pattern: प्राइस ॲक्शनमधील कॅन्डलस्टिक पॅटर्न
कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नमध्ये हातोडा (Hammer), Inverted Hammer, बुलिश एन्गलफिंग (Bullish Engulfing), मॉर्निंग स्टार (Morning Star), शूटिंग स्टार (Shooting Star), बेअरिश एन्गलफिंग (Bearish Engulfing), हँगिंग मॅन (Hanging Man), Bullish Harami, Bearish Harami, Piercing Pattern, Evening Star, Three White Soldiers, Three Black Crow, Doji आदी कॅन्डल स्टिक पॅटर्न आहेत.
वरील किती चार्ट पॅटर्नचा अभ्यास करावा ?
चार्ट ओपन केल्यावर बऱ्याच लोकांना चार्टवर कोणताच पॅटर्न दिसत नाही. त्याचे कारण म्हणजे ते चार्टचे कधीच निरीक्षण करीत नाहीत. त्यांनी त्यांचे डोळ्यासमोर चार्ट होताना कधीच पाहिलेला नसतो. त्यामुळे वेळ निघून गेल्यावर म्हणजेच ट्रेड हातून निघून गेल्यावर त्यांना चार्टवर एखादा पॅटर्न तयार झालेला दिसून येतो. चार्टची संख्या बरीच असली तरी अभ्यास होणार नाही एवढी सुद्धा नाही. मात्र ज्यांना जास्त रिस्कच घायची नाही, अशा लोकांनी एक ना धड भाराभर चिंध्या प्रमाणे, सर्वच चार्ट पॅटर्न शिकण्याऐवजी काही निवडक आणि आपणाला सहज समजणारे चार्ट पॅटर्न समजून घ्यावेत आणि त्यावर प्रभुत्व निर्माण करावे. आपण प्रभुत्व केलेल्या दोन चार निवडक पॅटर्नवर ट्रेडिंग केली तरी कमी रिस्क आणि जास्त फायदा होईल.
Support and Resistance: प्राइस ॲक्शनमधील सपोर्ट आणि रेझिस्टन्स
Support and Resistance म्हणजे चार्टवर असे विशिष्ट किमतीचे स्तर शोधणे जिथे खरेदीदार किंवा विक्रेते यांनी यापूर्वी आपल्या ऑर्डर घेतलेल्या असतात म्हणजेच त्या ठिकाणी त्यांनी खरेदी केलेली असावी किंवा विक्री केलेली असावी. हे सपोर्ट अँड रेसिस्टन्स Horizontal स्वरूपाचे असतात म्हणजेच चार्टवर आडवे आखले जातात. त्या प्रकारची ट्रेडिंग करायची आहे, त्या प्रमाणे 5 मिनिट, 15 मिनिट, 1 तास, 4 तास किंवा 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिन्याच्या चार्टवर Support and Resistance च्या आडव्या रेषा आखून त्यानुसार ट्रेड घेतला जातो. कारण याच लाईनवर यापूर्वी खरेदीदार सक्रिय होऊन किंमत वाढलेली असते आणि रेझिस्टन्स लेव्हल म्हणजे जिथे विक्रेते सक्रिय होऊन किंमत खाली आलेली असते.
Trendline: प्राइस ॲक्शनमधील ट्रेंड लाईन्स
प्राइस ॲक्शनमध्ये ट्रेंड लाईन्स Trend Lines चा उपयोग सुद्धा चांगला केला जातो. खालच्या दिशेने किंवा वरच्या दिशेने जाणाऱ्या एखाद्या शेअरच्या किमतीच्या हालचालीला जोडणाऱ्या रेषा (उंच बिंदूंना किंवा खालच्या बिंदूंना) काढणे आवश्यक असते. यामुळे बाजाराची दिशा (अपट्रेंड, डाउनट्रेंड किंवा साईडवेज) कोणातही आहे हे समजते.
प्राइस ॲक्शनबाबतच्या पुढील लेखात आपण प्राइस ॲक्शन ट्रेडिंगचे फायदे काय आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा हे पाहूया. मात्र त्यापूर्वी शेअर बाजारात हमखास नफा मिळवून देणारी “प्राइस ॲक्शन" (Price Action Theory) काय आहे? हे समजण्यासाठी प्राइस ॲक्शनमध्ये समावेश होणारे चार्ट पॅटर्न Chart Patterns, प्राइस ॲक्शनमध्ये समावेश होणारे कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न Candlestick Chart Patterns, प्राइस ॲक्शनमधील सपोर्ट आणि रेझिस्टन्स Support and Resistance, प्राइस ॲक्शनमध्ये ट्रेंड लाईन्स Trend Lines चा उपयोग या बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आणि गरजेचे आहे.
टिप्पणी पोस्ट करा