Bearish Rectangular Chart Pattern: मंदी दर्शविणारा आयताकृती चार्ट पॅटर्नचा वापर करून फायदेशीर ट्रेड घेण्याचे नियम

थोडक्यात महत्वाचे: Trend Continuation Bearish Rectangular Chart Pattern

BTC USD Chart 19 June 2025

प्राइस अॅक्शनचा भाग असलेला चार्ट पॅटर्न मधील "बेअरिश रेक्टेंगुलर चार्ट पॅटर्न" (Bearish Rectangular Chart Pattern) हा तांत्रिक विश्लेषणातील (technical analysis of price) एक अत्यंत महत्वपूर्ण आणि किंमतीमधील सातत्य दर्शविणारा पॅटर्न (continuation chart pattern) आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजेच, हा चार्ट पॅटर्न असे सूचित करतो की सध्याचा खाली जाणारा ट्रेंड (downtrend) यापुढेही सुरूच राहण्याची शक्यता आहे.

बेअरिश रेक्टेंगुलर चार्ट पॅटर्न म्हणजे काय? (What is a Bearish Rectangle Pattern?)


समजा एखाद्या शेअर किंवा बाजाराची किंमत / भाव खाली येत असतो (bearish trend), तेव्हा काही काळ तो एका विशिष्ट रेंजमध्ये (range) किंवा दोन समांतर रेषांच्या (parallel lines) दरम्यान वर-खाली फिरत असतो. अशा वेळी चार्टवर दिसणारा हा पॅटर्न आयताकृती (rectangular) आकारात दिसतो. या आयताकृती रचनेतील वरची आणि खालची बाजू / लाईन अनुक्रमे रेझिस्टन्स (resistance) आणि सपोर्ट (support) पातळी दर्शवते आणि ही पातळी ज्यावेळी खालच्या बाजूने तुटून भाव खाली येतो तेव्हा हा पॅटर्न पूर्णत्वास जातो. हा पॅटर्न मुख्यत: अशा वेळी तयार होतो जेव्हा की, विक्रीचा दबाव (selling pressure) काही काळासाठी तात्पुरता थांबतो आणि खरेदीदार (buyers) व विक्रेते (sellers) यांच्यात एक प्रकारचा समतोल (equilibrium) साधला जातो. मात्र, हा समतोल जास्त काळ टिकत नाही आणि किंमत खाली येते.

बेअरिश रेक्टेंगल पॅटर्नची वैशिष्ट्ये (Characteristics of Bearish Rectangle Pattern?)



1) पूर्वीचा ट्रेंड (Prior Trend) सुरू असणे: हा पॅटर्न तयार होण्यासाठी शेअरच्या किमतीत घट (downtrend) झालेली असावी म्हणजे मार्केट lower low लावून खाली येत जाणे आवश्यक आहे.

2) आयताकृती रचना (Rectangular Formation) तयार होणे: मार्केट lower low लावून खाली येत असताना किमत एका मर्यादित श्रेणीत आणि समांतर लाईनमध्ये (parallel trading range) वर-खाली फिरत असते आणि त्यामुळेच चार्टवर आयता सारखा आकार दिसतो. या आयाताची खालची पातळी सपोर्ट आणि वरची पातळी रेझिस्टन्स (Support zone and Resistance zone) दर्शवीत असतो.

3) ब्रेकडाउन (Breakdown) खालच्या दिशेने होणे: हा पॅटर्न पूर्णत्वास जाण्यासाठी बाजाराची/शेअरची किंमत सपोर्ट पातळीच्या खाली येते (ब्रेकडाउन होते) आणि त्या पातळीच्या खाली टिकून राहणे आवश्यक आहे. त्यानंतर पूर्वी सुरू असलेला मंदीचा ट्रेंड पुन्हा सुरू झालेला असतो.

महत्वाचे- सोबत अनेक चार्ट दिलेले आहेत. हा चार्ट पॅटर्न किंवा कोणातही पॅटर्न प्रत्यक्ष चार्टवर एकदम सारखाच दिसेल याची अपेक्षा करू नका. दिसण्यात थोडाफार फरक दिसून शकतो. त्यामुळे चार्ट ओळखून ट्रेड करणे ही मोठीच कला आणि दीर्घ अभ्यास आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने