Bullish Rectangular Chart Pattern: तेजीचा आयताकृती चार्ट पॅटर्न म्हणजे काय आणि ट्रेड घेण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा

काय आहे तेजीचा आयताकृती चार्ट पॅटर्न Bullish Rectangular Chart Pattern?


इंग्रजी भाषेतील Bullish Rectangular Chart Pattern (बुलिश रेक्टँगुलर चार्ट पॅटर्न) याला मराठीतील अर्थाचा शब्द "तेजीचा आयताकृती चार्ट पॅटर्न" असा वापरला जावू शकतो. हा पॅटर्न मार्केटमधील पूर्वीच ट्रेंड किंवा पूर्वीची चाल पुढे चालू ठेवणारा म्हणजेच एक कंटीन्यूएशन पॅटर्न (Continuation Pattern) आहे. याचा अर्थ, हा पॅटर्न तयार झाल्यावर, शेअरची किंमत सामान्यतः मूळ ट्रेंडमध्येच पुढे जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली असते.

बुलिश रेक्टँगुलर पॅटर्न म्हणजे Consolidation phase?

Consolidation phase म्हणजे जेव्हा एखाद्या विशिष्ट शेअर किंवा बाजाराची किंमत एका विशिष्ट रेंजमध्ये राहते. या पॅटर्नचा विचार केल्यास असे म्हणत येतील की, एका वरच्या आणि एका खालच्या रेषेच्या दरम्यान आयताकृती डब्बा तयार होतो आणि या डब्ब्यात किंमत काही काळ स्थिर राहते किंवा त्यातच खाली वर- वर खाली अशी होते, तेव्हा हा पॅटर्न तयार होतो. ही स्थिती त्या शेअरची 'कंसोलिडेशन' (consolidation) किंवा 'साइडवेज ट्रेंड' (sideways trend) ची असते.

आयताकृती चार्ट पॅटर्न Bullish Rectangular Chart Pattern ची प्रमुख वैशिष्ट्ये


1) पूर्वीचा ट्रेंड (Previous Trend) कोणता असावा:- प्रत्यक्ष चार्टवर हा पॅटर्न दिसण्यापूर्वी शेअरची किंमत वरच्या दिशेने म्हणजेच तेजीमध्ये (uptrend) असावी लागते.

2) कंसोलिडेशन स्थिती (Consolidation phase) असावी:- मार्केट किंवा शेअरची किमत तेजीच्या ट्रेंडमध्ये असताना, किंमत काही काळासाठी आयताकृती डब्ब्यात (वरची लाईन resistance चे काम करते आणि खालची लाईन support चे काम करते) अडकून पडते. खालची आणि वरची किंमत पातळी समांतर रेषेसारखी दिसते आणि त्यामुळे आयात सारखा आकार तयार होतो.

3) आयातामधून ब्रेकआउट (Breakout) घेतला असावा:- जेव्हा शेअरची किंमत या आयताकृती पॅटर्नच्या वरच्या रेझिस्टन्स पातळीला (resistance level) मोठ्या व्हॉल्यूमसह (high volume) तोडून वर जाते, तेव्हा त्याला 'ब्रेकआउट' म्हणतात. हा तेजीच्या ट्रेंडमध्ये पुढील वाढीचा संकेत असतो.

Bullish Rectangular  पॅटर्न तयार होण्याचे कारण

अगोदरच तेजीमध्ये असलेल्या शेअरमध्ये ज्या गुंतवणूकदार लोकांनी पूर्वीच खरेदी केली आहे असे खरेदीदार किंवा गुंतवणूकदार resistance level वर नफा बुक करतात आणि याच दरम्यानच्या काळात किंमत आणखी वर जाणार या शक्यतेने नवीन खरेदीदार सुद्धा प्रवेश करतात. अशा परिस्थितीत काही काळ किंमत थोडी फार खाली वर होवून एका स्थिर होते आणि एका आयताकृती डब्ब्यात अर्थात विशिष्ट रेंजमध्ये व्यवहार करते. जेव्हा खरेदीदार लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते त्यावेळी आणि विक्रीचा दबाव कमी होतो आणि खरेदीचा वाढतो. तेव्हा किंमत वरची लाईन म्हणजेच रेझिस्टन्स पातळी तोडून वर जाते आणि पूर्वीचा तेजीचा ट्रेंड (Continuation Pattern) पुन्हा सुरू होतो.

Bullish Rectangular Chart Pattern चा ट्रेडिंगसाठी याचा उपयोग कसा करावा?

ट्रेडर या पॅटर्नचा वापर करून खरेदीच्या संधी शोधू शकतात. ब्रेकआउट झाल्यावर म्हणजेच आयताकृती डब्ब्याचे वर किंमत गेल्यावर योग्य ठिकाणी एंट्री घेऊन आणि support चे त्खाली योग्य स्टॉप-लॉस लावून, नफा कमावता येतो.


महत्वाचे- सोबत अनेक चार्ट दिलेले आहेत. हा चार्ट पॅटर्न किंवा कोणातही पॅटर्न प्रत्यक्ष चार्टवर एकदम सारखाच दिसेल याची अपेक्षा करू नका. दिसण्यात थोडाफार फरक दिसून शकतो. त्यामुळे चार्ट ओळखून ट्रेड करणे ही मोठीच कला आणि दीर्घ अभ्यास आहे. तसेच मी ट्रेड घेतलेला live चार्ट क्रमांक 1 जो की बीटीसी- यूएसडीचा आहे, सोबत दिलेला आहे. त्याचे निरीक्षण करा आणि असले चार्ट ओळखता आले पाहिजेत याचा सराव करा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने