RISING WEDGE PATTERN राईझिंग वेज पॅटर्न म्हणजे काय?
![]() |
30 मिनिट GOLD-USD चार्ट जो की, 13 जून 2025 रोजीचा आहे.... |
रायजींग वेज चार्ट पॅटर्न म्हणजे काय? Rising wedge chart pattern बाबत या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास Rising म्हणजे ऊर्ध्वगामी किंवा वर जाणारा आणि Wedge म्हणजे बाजार, किंमत किंवा कमाई. येथे Rising Wedge ला आपण वाढणारी किंमत असे म्हणू. मात्र ही वाढ अल्पकालीन, थोडासा पॉज घेणारी असते आणि आणि पुढे जावून बाजाराचा पूर्वीचा ट्रेंड किंवा कल पुन्हा सुरू ठेवते. हा एक Trend Continuation Pattern असल्याने बाजार किंवा एखादा शेअर वर वर जाताना निमुळता होत जावून दणकण खाली कोसळतो. हा त्रिकोण असे दर्शवितो की, खरेदी करणार लोकांची संख्या आणि खरेदीची मात्रा कमी कमी होते आणि विक्री करणाऱ्यांची संख्या आणि मात्रा (Volume) वाढत जाते. त्यानंतर हा Up Trend खंडित होवून मंदीचा पूर्वीचा कल सुरू होतो, म्हणजेच मार्केट कोसळण्यास सुरुवात होते. म्हणजेच, जेव्हा हा पॅटर्न दिसतो, तेव्हा किंमत वाढण्याचा ट्रेंड संपून त्या शेयरची किंमत कमी होण्याचा म्हणजेच खाली येण्याचा ट्रेंड सुरू होण्याचे दर्शक आहे आणि यालाच रायजींग वेज चार्ट पॅटर्न असे म्हणतात.
Rising Wedge Chart Pattern राईझिंग वेज पॅटर्न बुल्लिश आहे की बियरीश?
![]() |
हा क्रूड ऑइलचा चार्ट आहे. |
रायझिंग वेज पॅटर्न बुल्लिश आहे की बियरीश याचे उत्तर एका वाक्यात द्यायचे झाल्यास हा पॅटर्न बियरीश आहे असे सांगता येईल. Rising Wedge Pattern कसा दिसतो? आपण चार्टवर पाहिल्यानंतर हा चार्ट पॅटर्न वरच्या दिशेने झुकणाऱ्या दोन ट्रेंड लाईनमध्ये (upward sloping trend lines) तयार होतो आणि नंतर या दोन ट्रेंड लाईन्स हळू हळू एकमेकांच्या जवळ येत जातात. नंतर या दोन ट्रेंड लाईन्सच्या मध्ये किंमत फिरत राहते आणि पुढे जावून किमतीचा उच्चांक (higher highs) बनवते. परंतु पुढे जावून खरेदीदारांचा दबदबा कमी होतो आणि किंमत वरची गती (uptrend momentum) गमावून बसते आणि किंमत खाली कोसळते. याचाच अर्थ असा आहे की, हा पॅटर्न बियरीश आहे.
Rising Wedge Chart Pattern ऊर्ध्वगामी त्रिकोण तयार होण्या मागची करणे आणि Trading Psychology काय सांगते?
ट्रेडिंग चार्टवर तयार होणारा कोणताही चार्ट पॅटर्न असो की कॅन्डलस्टिक पॅटर्न, ते तयार होण्याची करणे असतात. आणि त्याचे मागे एक मोठे विज्ञान तर असतेच आणि त्याहीपेक्षा मार्केटमध्ये काम करणाऱ्या व्यापाऱ्यांची मानसिकता हे प्रमुख कारण आहे. व्यापाऱ्यांची मानसिकता म्हणजेच Trading Psychology ! आणि हे सर्वात मोठे साधन आहे जे की, मार्केटला वेगवेगळे आकार देत असते, असे म्हटले तर गैर ठरणार नाही. Rising Wedge Chart Pattern तयार होतोच का आणि कसा? याचे उत्तर सुद्धा मानसिक अवस्थेत दडलेले आहे आणि हे उत्तर मिळल्याशिवाय आपण प्रत्यक्ष चार्टवर कितीही मेहनत घेतली तरी फायदा होणार नाही. कारण मार्केटमध्ये फक्त 10 टक्के अभ्यास आणि 90 टक्के मानसिकता काम करीत असते; म्हणजेच प्रत्यक्ष व्यापार मानसिकता, ट्रेडिंग सायकॉलॉजी किंवा व्यापारी मानसिकता (Trading Psychology) काम करीत असते. त्यात भीती, लालूच या भावना मोठ्या प्रमाणावर काम करतात. आणि त्यानुसारच आपण ट्रेड घेत असतो.
उदहरणा दाखल आपण वरील चार्ट समजून घेवू. चार्टचे निरीक्षण केले असता दिसून येईल की, किंमत वरुन खाली येत आहे आणि नंतर दोन निळ्या रेषांमधील Rising Wedge तयार झाला आहे. विक्रेते लोकांनी खूप ताकद लावून किंमत खाली आणली आहे. त्यानंतर पुन्हा खरेदी करणार लोकांनी किंमत वर नेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा विक्री करनारांनी खाली आणण्याचा प्रयत्न केला आणि किंमत निळ्या रेषांमधील वेजमध्ये खाली-वर फिरत राहिली असली तरी एकंदरीत किमतीचा विचार केल्यास किंमत वरच गेली आहे. मात्र विक्रेत्यानी हार न मानता किंमत खाली आणण्याचा प्रयत्न काही सोडला नाही. त्यांची संख्या मोठी आहे कारण यापूर्वीच बाजराची दिशा खालची (Down Trend) आहे. त्यानंतर Support आणि Resistance चे काम करणाऱ्या दोन्ही निळ्या रेषांमधील अंतर कमी कमी होत जाते म्हणजेच खरेदीदार किंवा विक्रेते यापैकी कुणी तरी हारणार आहे, हे निश्चित होते आणि नंतर विक्रेते अधिक ताकदीने मार्केट खाली आणतात आणि या पॅटर्न तयार होतो.
बाजाराने एकदा का खालीची निळी रेषा जी की आतापर्यंत Support चे काम करीत होती ती तोंडली की मार्केट झपाट्याने खाली येवून त्याचा पूर्वीचा कल (Previous Trend/ Trend Continuance), खालच्या दिशेने पुन्हा नव्याने सुरू होतो. थोडक्यात हा पॅटर्न सुद्धा Buyers and Sellers यांचे मधील द्वंद्व युद्धामुळे तयार झालेला आहे. यामध्ये Buyers and Sellers यांची मानसिक स्थिती कारणीभूत झाली आहे. ज्यावेळी Buyers लोकांना वाटले की, येथून मार्केट जाण्याची दाट शक्यता आहे, त्यावेळी त्यांनी थोडीफार ताकद लावून त्याला वर वर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्यावेळी त्यांची ताकद संपली त्यावेळी मात्र त्यांनी मार्केटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि मार्केट धडाडधूम करीत खाली कोसळले. ही आहे साधी आणि सोपी व्यापारी मानसिकता.
राईझिंग वेज पॅटर्नचा वापर करून ट्रेड कसा घ्यायचा आणि टार्गेट किती ठेवायचे?
वर आपण Rising Wedge Chart Pattern ऊर्ध्वगामी त्रिकोण तयार होण्यामागची करणे आणि Trading Psychology म्हणजेच व्यापारी मानसिकता याबाबत माहिती घेतली आणि हा पॅटर्न कसा तयार होतो याबाबत सुद्धा सविस्तर विश्लेषण केले आहे. आता प्रश्न पडतो की, नवीन ट्रेडर्स लोकांनी मग ट्रेड कधी, कुठे घायचा आणि नफ्याचे टार्गेट किती ठेवायचे? हा एक Trend Continuation पॅटर्न आहे. म्हणजेच हा पॅटर्न पूर्वीचा मोठा ट्रेंड जो काही असेल त्याला पुढे चालू ठेवण्याचे काम करतो. वरील चार्टचे निरीक्षण करा. दोन हिरव्या रेषांमध्ये मार्केट गेले आणि पुढे जावून त्या रेषा एकमेकांच्या जवळ आल्या. त्यानंतर मार्केटने खालच्या Support Line ला तोडले आणि मार्केट खाली आहे. जेथे मार्केट खाली आले, तेथेच आपण मार्केट थोडेसे Retrace झाले की प्रवेश घ्यायचा आहे आणि त्याचे अगोदर असलेल्या Swing High वर आपला Stop Loss ठेवायचा आहे. आपले टार्गेट किती ठेवायचे याबाबत अनेक मते आहेत, मात्र जेथून मार्केट खाली कोसळले होते, तेथपर्यंत आपले टार्गेट राहील किंवा आपल्या सोयीनुसार किमान 1:2 किंवा 1:3 असे टार्गेट असावे.
महत्वाचे- सोबत अनेक चार्ट दिलेले आहेत. हा चार्ट पॅटर्न किंवा कोणातही पॅटर्न प्रत्यक्ष चार्टवर एकदम सारखाच दिसेल याची अपेक्षा करू नका. दिसण्यात थोडाफार फरक दिसून शकतो. त्यामुळे चार्ट ओळखून ट्रेड करणे ही मोठीच कला आणि दीर्घ अभ्यास आहे.