Falling Wedge Chart Pattern: काय आहे फॉलिंग वेज चार्ट पॅटर्न आणि या पॅटर्नमधून बक्कळ पैसा कसा कामवायचा?

काय आहे फॉलिंग वेज चार्ट पॅटर्न आणि या पॅटर्नमधून बक्कळ पैसा कसा कामवायचा?

BTC USD- chart no. 1 (8 july 2025 chart)

अगोदरचा कल किंवा Previous Trend पुढे कायम ठेवणारा म्हणजेच Trend Continuation कल सातत्य ठेवणारा पॅटर्न आहे. आता फॉलिंग म्हणजे खाली कोसळणारा आणि वेज म्हणजे किंमत किंवा कमाई आणि फॉलिंग वेज म्हणजे खाली पडणारी किंमत किंवा बाजार असा शब्दश: अर्थ काढता येईल. मात्र ही खाली येणारी किंमत काही काळासाठी पॉज घेणारी किंवा थोडाफार थांबा घेणारी असते आणि त्यापुढे ती तिचा पूर्वीचा ट्रेंड चालू ठेवते. त्यामुळे त्याला पूर्णपणे फॉलिंग वेज म्हणता येणार नाही. 

हा पॅटर्न तांत्रिक दृष्टिने मार्केट वरच्या दिशेने जाणारा म्हणजेच एक तेजीचा (falling wedge: a bullish chart pattern) पॅटर्न आहे. मार्केट किंवा एखाद्या शेअरची किंमत दोन ट्रेंड लाईनमध्ये खाली येते आणि हा पॅटर्न तयार होतो. किंमत दोन उतरणाऱ्या ट्रेंड लाईन्समध्ये एकत्रित होते, आणि नंतर दोन लाईन निमुळत्या होत जावून, किंमत वरच्या लाईनला तोडून वर जाते आणि हा पॅटर्न तयार होतो. या चार्ट पॅटर्नचा वापर करून बक्कळ पैसा कमावता येतो.

Faling Wedge: फॉलिंग वेज चार्ट पॅटर्न तयार होण्यामागची Trading Psychology  


मुळातच हा चार्ट पॅटर्न Trend Continuation कल सातत्य ठेवणारा पॅटर्न असल्याने पूर्वीच मार्केटमध्ये तग धरून बसलेल्या खरेदीदार वर्गाच्या बाजूनेच वरच्या दिशेने जात असतो. वरील छायाचित्रात दाखविण्यात आलेल्या दोन निळ्या रेषेमधील वरची ट्रेंड लाईन ही प्रतिकार लाईन म्हणजेच (Resistance line) दर्शवते, तर खालची ट्रेंड लाईन समर्थन (Support line) दर्शवत आहे. 

वरच्या दिशेने जाण्यासाठी कोणती ट्रेडिंग सायकॉलॉजी म्हणजेच बाजारात शेअर्स खरेदी विक्री करणाऱ्या लोकांची मानसिकता, व्यापारी मानसशास्त्र तयार होते हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहे. कारण, मार्केटमध्ये 90 टक्के सायकॉलॉजी काम करते आणि 10 टक्के अभ्यास कामी येत असतो. अगोदरच बाजारात खरेदीदार वर्गाचे प्राबल्य असते त्यामुळे याठिकाणी मार्केट काही काल थांबा घेणार ही बाब निष्णात व्यापाऱ्यांना माहिती असते. त्यामूळे याठिकाणी कमीत कमी किंमतीत मिळणारे शेअर्स खरेदी करण्यासाठी त्यांच्यात झुंबड लागते.

तसेच काही खरेदीदार लोकांनी प्रॉफिट बुकिंग केल्याने किंवा त्याठिकाणी एखादा छोटा मोठा रेसिस्टनस तयार झाल्याने बाजारात काही प्रमाणात नवीन /शिकाऊ विक्रेते सुद्धा प्रवेश करतात आणि मार्केट थोडेफार खाली येण्यास सुरूवात होते. याठिकाणी खरेदी करणारे विक्री करणाऱ्या लोकांमध्ये रस्सीखेच सुरू होते. विक्री करणाऱ्या लोकांमध्ये जास्तीत जास्त नवीन शिक्षण घेणारे किंवा कमी प्रमाणात भांडवल असणारे लोक जास्त असतात. त्यामुळे मार्केट खाली पडणारा त्रिकोणी बाजार किंवा किंमत निर्देशांक तयार करीत करीत किंमत खाली येते. वरील छायाचित्रात दाखविल्या प्रमाणे दोन्ही निळ्या रेषांचे मधोमध किंमत वर खाली होवून शेवटी ती एका प्रबळ आधार पातळीवर (Support Level) येते आणि वरील छायाचित्रात दिसत असल्याप्रमाणे वरची निळी रेषा म्हणजेच Resistance line छेदून वर निघून जाते आणि हा पॅटर्न पूर्ण होतो.

Falling Wedge चार्ट पॅटर्न  बुल्लिश आहे की बियरीश?


हा पॅटर्न बुल्लिश आहे. म्हणजेच फॉलिंग वेज चार्ट पॅटर्न किंमतिच्या मंदीच्या ट्रेंडच्या शेवटी दिसतो आणि किंमत वरच्या दिशेने जाणार आहे हे दर्शवितो. हा एक Bullish chart pattern असल्याने मंदी संपली की किंमत झपाट्याने वर जात असते. अनेकदा तर किंमत एवढी गतीने वर जाते की, ट्रेडर्स लोकांना ट्रेड घेण्यासाठी सुद्धा वेळ मिळू देत नाही.

Falling Wedge: फॉलिंग वेजमध्ये ट्रेड कधी घ्यायचा आणि टार्गेट किती ठेवायचे?


वर आपण Falling Wedge Chart Pattern तयार होण्यामागची करणे आणि Trading Psychology म्हणजेच व्यापारी मानसिकता याबाबत माहिती घेतली आणि हा पॅटर्न कसा तयार होतो याबाबत सुद्धा सविस्तर विश्लेषण केले आहे. आता प्रश्न पडतो की, नवीन ट्रेडर्स लोकांनी मग ट्रेड कधी, कुठे घायचा आणि नफ्याचे टार्गेट किती ठेवायचे?  हा एक Trend Continuation पॅटर्न आहे. म्हणजेच हा पॅटर्न पूर्वीचा मोठा ट्रेंड जो काही असेल त्याला पुढे चालू ठेवण्याचे काम करतो. वरील चार्टचे निरीक्षण करा. दोन लाल रंगाच्या रेषांमध्ये मार्केट गेले आणि पुढे जावून त्या रेषा एकमेकांच्या जवळ आल्या. त्यानंतर मार्केटने वरच्या Resistance Line ला तोडले आणि मार्केट वर गेले. जेथून मार्केट वर गेले, तेथेच आपण मार्केट थोडेसे Retrace झाले की प्रवेश घ्यायचा आहे आणि त्याचे अगोदर असलेल्या Swing Low वर आपला Stop Loss ठेवायचा आहे. आपले टार्गेट किती ठेवायचे याबाबत अनेक मते आहेत, मात्र जेथून मार्केट वर गेले होते, तेवढेच आपले टार्गेट राहील किंवा आपल्या सोयीनुसार किमान 1:2 किंवा 1:3 असे टार्गेट असावे. 

महत्वाचे- सोबत अनेक चार्ट दिलेले आहेत. हा चार्ट पॅटर्न किंवा कोणातही पॅटर्न प्रत्यक्ष चार्टवर एकदम सारखाच दिसेल याची अपेक्षा करू नका. दिसण्यात थोडाफार फरक दिसून शकतो. त्यामुळे चार्ट ओळखून ट्रेड करणे ही मोठीच कला आणि दीर्घ अभ्यास आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने