Head and Shoulder Chart Pattern: हेड अँड शोल्डर चार्ट तयार होण्यामागची ट्रेडिंग ट्रेडिंग सायकॉलॉजी काय आहे?

हेड अँड शोल्डर्स चार्ट पॅटर्न म्हणजे काय? 

हेड अँड शोल्डर्स हा एक चार्ट पॅटर्न असून डोके आणि दोन बाहू सारखा दिसत असल्याने त्याला (Head and shoulders resembles the human head and two shoulders shape) असे नाव पडले आहे. यामध्ये दोन्ही भुजा, बाहू या थोड्याफार फरकाने सारख्याच उंचीच्या असतात आणि डोके जास्त उंचीचे असते. म्हणजेच पहिली भुजा किंवा बाहू तयार होताना मार्केट तेथील रेसिसटन्स लेवलवरून (Resistance Level) खाली येते. त्यानंतर मार्केट गळ्याच्या पातळीपासून म्हणजेच Neck Line पासून वर जाते आणि पुन्हा खाली येते. तिसऱ्यांदा पुन्हा वर जाते मात्र त्याठिकाणी पुन्हा जाण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा रेसिसटन्स लेवल (Resistance Level) ला तोंड द्यावे लागत असल्याने पुन्हा खाली कोसळले आणि हा पॅटर्न तयार होतो. यालाच Head and Shoulders Pattern असे म्हणतात. हा पॅटर्न खूप महत्वाचा आणि मोठा नफा मिळवून देणारा पॅटर्न आहे. प्रत्यक्ष चार्टवर हा शोधून काढणे अत्यंत जिकिरीचे आणि कौशल्याचे काम आहे; आणि हे कौशल्य, कसब आणि मेहनतच शेवटी एक यशस्वी ट्रेडर निर्माण करीत असते. त्यासाठी अभ्यास आणि अभ्यास हे एकच साधन आहे, त्याला पर्याय नाही. कारण त्याशिवाय आपल्या डोळ्यांना सराव होणार नाही. 
 चार्ट BTC-USD chart dated 17 June 2025

वरील चार्टचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास आपणास दोन्ही शोल्डर्स 1,07600 या किमतीच्या आसपास दोन शोल्डर्स तयार झाले असल्याचे स्पष्ट दिसून येईल. तर या दोन्ही Shoulders मध्ये डोक्यासारखा भाग तयार झाला असून त्याला head असे संबोधले जाते. आणि त्यानंतर किमत दणक्यात खाली कोसळली असल्याचे दिसून येते.  

Head and Shoulders चार्ट पॅटर्न बुलीश आहे की बियरीश? 

वरील प्रश्नाचे उत्तर, एका वाक्यात द्यायचे झाल्यास हा चार्ट पॅटर्न बियरीश आहे असे सांगता येईल. कारण हा पॅटर्न तयार होत असताना विक्रेते लोकांची आपल्या जवळचे शेअर्स मिळेल त्या किमतीत विकण्यासाठी घाई झालेली असते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, पॅटर्न तयार झाला आणि बाजार आता कोसळणार आहे, त्यामुळे नुकसान न होता आणि अधिकचा नफा अपेक्षित न ठेवता मिळेल ती किंमत घायची आणि मार्केटमध्ये सेफ व्हायचे अशी Trading Psychology तयार झालेली असते. 

Head and shoulder pattern चार्टवर तयार होण्यामागची Trading Psychology 

आता हा पॅटर्न मुळात तयार होतोच का? या प्रश्नाचे उत्तर मिळल्याशिवाय आपण प्रत्यक्ष चार्टवर कितीही मेहनत घेतली तरी फायदा होणार नाही. कारण मार्केटमध्ये फक्त 10 टक्के अभ्यास आणि 90 टक्के मानसिकता काम करीत असते; म्हणजेच प्रत्यक्ष व्यापार मानसिकता, ट्रेडिंग सायकॉलॉजी  किंवा व्यापारी मानसिकता (Trading Psychology) काम करीत असते. त्यात भीती, लालूच या भावना मोठ्या प्रमाणावर काम करतात. उदहरणादाखल येथे आपण खालील चार्ट समजून घेवू. चार्टवरील Left Shoulders चे पूर्वी मार्केट वरच्या दिशेने येत होते. त्यानंतर  Left Shoulder चे ठिकाणी त्याला Resistance Level ला म्हणजेच अडथळ्याला तोंड द्यावे लागले. त्यामुळे मार्केट खाली Neck Line पर्यन्त आले. या Neck Line वर मार्केटने एक Support Level तयार केली आणि मार्केट मोठ्या ताकदीने वर गेले. Left Shoulder ला पार करून मार्केट वर तर गेले मात्र तेथे पुन्हा Resistance Level ला म्हणजेच अडथळ्याला तोंड द्यावे लागले आणि येथे Head तयार झाले. मार्केट Neck Line वर तयार झालेल्या Support Level पुन्हा खाली आले. येथून पुन्हा एकदा खरेदीदारांनी ताकद लावून मार्केट वर ढकलत नेले. मात्र त्यानंतर पूर्वीच्या Left Shoulder वर तयार झालेल्या Resistance Level वरुन मार्केट खाली आले, तेथे Right Shoulder तयार झाला आणि नंतर मार्केट पडत राहिले. हे सर्व काही त्यावेळच्या खरेडीदार आणि विक्रेते यांच्यातील खरेदी करणे, विक्री करणे या मानसिकतेतून घडले आहे आणि हेच प्रत्यक्ष मार्केटमध्ये सुद्धा चालत असते.


हेड अँड शोल्डर्सचा वापर करून ट्रेड कसा घ्यायचा आणि टार्गेट किती ठेवायचे?

हेड अँड शोल्डर्सचा वापर करून ट्रेड कसा घ्यायचा आणि टार्गेट किती ठेवायचे या बाबीचा विचार केल्यास, सर्वप्रथम पहिला शोल्डर Left Shoulder तयार झाल्यावर सपोर्ट लेवल (Support Level) म्हणजेच नेक लाईनवरुन मार्केट जात असते. मात्र मार्केट वर जावून पुढे न जाता येथे हेड Head तयार करून पुन्हा खाली येते आणि Neck Line नेक लाईनवर Support घेवून पुन्हा वर जाते. आता आपण अलर्ट होऊन Left Shoulder चे लेवलवर Right Shoulder तयार होण्याची संधी शोधायची आणि तेथे एखादा Bearish Candlestick Pattern तयार झाल्यास तेथे तात्काळ Entry घेवून मार्केटमध्ये प्रवेश करायचा. येथे Head चे थोडाफार वर Stop Loss लावून मार्केटमध्ये मानसिक अवस्था चलबिचल न ठेवता कायम राहायचे आणि आपले टार्गेट असेल जेथून मार्केट वर गेले होते तेथपर्यंत किंवा आपल्या सोयीनुसार जास्तीत जास्त टार्गेट घेता येईल. 

हा चार्ट पॅटर्न बाजारात घसरण होण्याचे निर्देश देत असतो. त्यामुळे बाजार किंवा एखादा शेअर/स्टॉकची किंमत सुद्धा खाली येते. सोबत दिलेले छायाचित्र चार्ट क्र. 1 हे BTC-USD चे उदाहरण असून ते दिनांक 17 जून 2025 चे आहे. त्यामध्ये आपणास हेड अँड शोल्डर कसे दिसते हे आपल्या लक्षात येईल. असा पॅटर्न तयार झाल्यावर छायाचित्रात दाखविल्या प्रमाणे ट्रेड घेता येवू शकेल. आपला स्टॉपलॉस ताबडतोब लावून नुकसाणीचा धोका कमी करता येते. आपले टार्गेट जास्तीत जास्त असावे किंवा आपल्या सोयीनुसार किमान 1:2 किंवा 1:3 असे टार्गेट असावे. 

महत्वाचे- हा चार्ट पॅटर्न किंवा कोणातही पॅटर्न प्रत्यक्ष चार्टवर एकदम सारखाच दिसेल याची अपेक्षा करू नका. दिसण्यात थोडाफार फरक दिसून शकतो. त्यामुळे चार्ट ओळखून ट्रेड करणे ही मोठीच कला आणि दीर्घ अभ्यास आहे. तसेच ट्रेड घेण्यापूर्वी एक पुल बॅकची वाट पाहणे आवश्यक आहे. 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने